बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई बनणार आहे. बिपाशाने नुकतंच आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. बिपाशाने बेबी बम्पसोबत एकदम बोल्ड फोटोशूट केलं आहे. फोटोंमध्ये पती करण सिंह ग्रोव्हरसुद्धा आहे. बिपाशा लग्नाच्या तब्बल सात वर्षांनंतर आई बणनार आहे. अभिनेत्री सध्या वयाच्या चाळीशीत आहे. तर पती आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हरचं हे तिसरं लग्न आहे.