'बिग बॉस ओटीटी' विजेती दिव्या अग्रवाल लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या फोटो आणि फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटदरम्यान ती क्रेझी पोज देत आहे. फोटोशूटमधील फोटो शेअर करताना तिने स्वतःची तुलना रणवीर सिंगसोबत केली आहे.
दिव्या अग्रवालने या फोटोंमध्ये कॉलर आणि बेल्टच्या खाली निऑन असलेला मेटॅलिक पॅंटसूट परिधान केलेलं दिसत आहे. यामध्ये ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे.
दिव्या अग्रवालने पँटसूटमध्ये निऑन हाय-नेक टॉपसुद्धा घातला आहे. आणि ब्लिंगी पीसने तिचा लूक कम्प्लिट केला आहे.
फोटोशूटचे हे फोटो शेअर करत दिव्या अग्रवालने लिहिले की, "मी माझ्या आतल्या रणवीर सिंगला बाहेर काढत आहे'.
रणवीर सिंगला 'किंग ऑफ क्विर्क' म्हटले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे, दिव्याने या फोटोशूटमध्ये असेच काही करण्याचा प्रयत्न केला आहे.
'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यानंतर दिव्या अग्रवाल तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे आणि प्रोफेशनल कमिटमेंटवर काम करत आहे.
दिव्याने 'बिग बॉस ओटीटी'मध्ये तिच्या खेळाने प्रेक्षक आणि चाहत्यांना प्रभावित केल आहे. शोदरम्यानच त्याची 'कार्टेल' वेबसिरीज आली होती. यामध्ये ती वेगवेगळ्या भूमिकेत दिसली होती.
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या सीझनच्या विजयावर दिव्या फारच खूश आहे आणि तिने याला ऐतिहासिक म्हटलं आहे.इतकंच नव्हे तर ती म्हणते कि लोक की लोक तिला 15 वर्षेही लक्षात ठेवतील.