बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरामध्ये वाद-विवाद, राडे, मस्ती, धम्माल, टास्क पहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य ! काल कॅप्टन पदासाठी दोन उमेदवार मिळाले आहेत. ते म्हणजे रोहित आणि अक्षय. आज या दोन उमेदवारांमध्ये कॅप्टनीपदासाठी कार्य होणार आहे. त्यामुळे आता कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हंटल म्हणजे भांडणं, मारामारी, हे आलंच. त्यामुळे आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या कार्यामध्ये जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच खरा पार्किंगचा किंग ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता आजच्या भागासाठी आतुरतेनं वाट पाहत आहे. बिग बॉसची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं दिसत आहे.