'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन फारच धमाकेदार ठरला. यामध्ये अक्षय केळकर विजेता ठरला. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपविजेता ठरली. अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. शो संपल्यानंतरसुद्धा अभिनेत्री अजूनही चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यांनतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ई टाइम्सला मुलाखत दिली. यामध्ये तिने केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. यावेळी बोलताना अपूर्वा नेमळेकरने आपल्या बिग बॉसच्या घरातील खेळाबाबत संवाद साधला. मुलाखती दरम्यान अपूर्वा म्हणाली, 'मी ज्या प्रकारे माझा खेळ खेळले त्याचा मला अत्यंत आनंद आहे. मी एक स्ट्रॉंग स्पर्धक होते आणि ते माझ्या खेळातून दिसून आलं. मी माझ्या खेळावर खुश आहे. दरम्यान अभिनेत्रीने होस्ट महेश मांजरेकर यांच्याबाबत मोठं विधान करत म्हटलं, मी महेश मांजरेकरांनी दिलेल्या सूचनांच पालन न करता माझा खेळ उत्तम खेळले. ज्या लोकांनी त्यांच्या सूचनाच्या आधारे आपला खेळ खेळाला ते सर्वात आधी घराबाहेर गेले होते. सध्या अभिनेत्रींच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.