'कांचना 3' या तमिळ चित्रपटात दिसलेल्या निक्की तांबोळीला आता कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. या अभिनेत्रीने अगदी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
निक्कीला साऊथमध्ये लोक आधीपासूनच ओळखत होते. पण बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिला देशभरात ओळख मिळाली आहे. निक्कीला चाहत्यांचंही खूप प्रेम मिळालं आहे.
सध्या सर्वजण दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. नुकतंच निक्की तांबोळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी लूक्सचे काही फोटो शेअर केले असून यासोबत तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमीही दिली आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्की तांबोळी गुलाबी रंगाच्या डिझायनर एथनिक आउटफिट्समध्ये अधिक सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीचा हा फेस्टिव्ह लुक तरुणींसाठी खरोखरच एक उत्तम पर्याय बनू शकतो. या दिवाळीला हा लुक ट्राय करायला काहीच हरकत नाहीय.
निक्की तांबोळी आपल्या प्रत्येक पोस्टमधून लोकांचं लक्ष वेधून घेत असते. आजही असंच काहीसं झालं आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने एका नव्या सुरुवातीचा उल्लेख केला आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये एक घर आणि किल्लीचा इमोजीदेखील शेअर केला आहे. यावरुन निक्कीने नवीन घर खरेदी केल्याचा अंदाज लावला जात आहे.
निक्की सतत विविध रिऍलिटी शोमध्ये दिसून येते. दरम्यान निक्की सुकेश चंद्रशेखरप्रकरणातसुद्धा अडकली होती.