छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राला ओळखलं जातं.
सध्या मनोरंजन सृष्टीत लगीनघाई सुरु आहे. त्यामुळे तेजस्वी आणि करणचे चाहते त्यांनासुद्धा लग्न बंधनात अडकलेले पाहायला उत्सुक आहे.
नुकतंच करण कुंद्राने तेजस्वी आणि आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत करणने आपल्या मनातली गोष्ट सांगितली आहे.
यावेळी करणने सांगितलं की, तेजस्वी आणि कुटुंबीय लग्नासाठी तयारच आहेत. परंतु आम्हीच कामामध्ये व्यग्र आहे.
करणला वेडिंग डेस्टिनेशनबाबत विचारलं असता अभिनेता म्हणाला, मला कुठेही लग्न झालेलं चालेल मग सेट असो फिल्मसिटी किंवा इतर कुठेही.
करण म्हणाला 'मला खरं तर लग्नाचा विषय निघताच टेन्शन येतं परंतु लोकांना माझी आणि तेजस्वीची जोडी फारच आवडते. त्यांना आम्हाला पती-पत्नीच्या रुपात पाहायचं आहे.आणि ही आमच्यासाठी फारच सुखद गोष्ट आहे.