'बिग बॉस'चा सोळावा सीजन नुकतंच पार पडला. यामध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला ट्रॉफीला हुकावं लागलं असलं, तरी त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
बिग बॉस मराठीचा विजेता असणारा शिव ठाकरे सध्या बिग बॉस हिंदीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या शोनंतरसुद्धा शिव सतत चर्चेत आहे.
या पार्टीचा एक फोटो शिवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो अभिनेता सलमान खानसोबत पोझ देताना दिसून येत आहे.
दरम्यान नुकतंच दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवने सांगितलं की, ट्रॉफी मिळाली नसली तरी सलमान खानसोबत जो वेळ मिळाला त्यात मी समाधानी आहे.
अभिनेत्याने सांगितलं फिनालेनंतर आम्ही त्यांच्यासोबत पार्टी केली. आणि पार्टीनंतर मी त्यांच्याशी चर्चा केली.
तसेच काही मराठी प्रोजेक्टसबाबत आम्ही चर्चा केली. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने मला अभिमान वाटत आहे. असंही शिव म्हणाला.