'आता बिग बॉस स्वतः खेळणार' या टॅगलाईनच्या आधारे बिग बॉस 16 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. बिग बॉस 16 च्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये जोरदार वाद-विवाद होताना दिसत आहेत.
पहिल्या दिवसापासून अभिनेत्री सुम्बुल तौकीर आणि मिस इंडिया रनरअप मान्या सिंग यांच्यात चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं होतं.
परंतु एका नॉमिनेशन प्रक्रियेने या दोघींच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. आता मान्या सुम्बुलवर वैयक्तिक टीका करतांना दिसून येत आहे.
दुसऱ्याचं पदर धरुन पुढे जाणं योग्य नाही. हिम्मत असेल तर स्वतः च्या ताकदीने पुढे जावं'. मला वाटतं ती खोटं बॉन्डिंग निर्माण करत आहे.
याठिकाणी सर्वांना सिद्धार्थ आणि शेहनाज बनायचं आहे, परंतु ते शक्य नाही. कारण त दोघे एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते.
त्यांचं बॉन्डिंग फारच सुंदर होतं. आणि पाहताना ते खरं वाटतं होतं. पण सुम्बुल आणि शालिनच्या बाबतीत असं नाहीय.
हे लोक हे का विसरतात की शोच्या सरत्या शेवटी एकच व्यक्ती ट्रॉफी जिंकणार आहे. त्यामुळे स्वतःचा खेळ स्वतः खेळावा. असं म्हणत मान्याने राग व्यक्त केला आहे.