फक्त अभिनेत्रीच नव्हे तर अनेक अभिनेत्यांनासुद्धा कास्टिंग काऊचसारख्या प्रकारांना सामोरं जावं लागलं आहे.
'बिग बॉस १६'मुळे मराठमोळा शिव ठाकरे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शोमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा तो सतत चर्चेत आहे.
नुकतंच शिव ठाकरेने आपल्यासोबत करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडला असल्याचं उघड केलं आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत, शिव ठाकरेने सांगितलं की, मुंबईत आल्यांनतर मला एके ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं.
मी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर ते मला बाथरुममध्ये घेऊन गेले. आणि मला म्हटलं हे मसाज सेंटर आहे. ऑडिशन आणि मसाज सेंटरचा काय संबंध असा मला प्रश्न पडला. पण नंतर तो प्रकार लक्षात आला आणि मी तिथून बाहेर पडल्याचं शिवने सांगितलं.
एकदा नव्हे तब्बल दोनवेळा शिवला हा अनुभव आला आहे. एकदा एका महिलेने त्याला रात्री ऑडिशन घेण्यासाठी बोलावलं होतं. मात्र शिवने ती ऑफर धुडकावून लावली होती.
याबाबत बोलताना शिव म्हणतो, 'कास्टिंग काऊच फक्त मुलीच नव्हे तर मुलांसोबतही घडतं. मुलांनासुद्धा या वातावरणात असुरक्षित वाटतं. कास्टिंग काऊचमध्ये मुलगा मुलगी फरक नसतो ते कोणासोबतही घडू शकतं'.