'बिग बॉस 15' ची विजेती रुबिना दिलैक सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजही असंच काहीसं झालं आहे. रुबिनाने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. रुबिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सुंदर निसर्ग आणि पहाडी वातावरणात दिसून येत आहे. खरं तर अभिनेत्री आपल्या मूळ गावी म्हणजेच, चौपाल हिमाचल प्रदेश याठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीचं गाव फारच सुंदर आणि निसर्गरम्य असल्याचं दिसत आहे. रुबिना सध्या धावपळीच्या जगापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवत आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'माय व्हिलेज नीड #नो फिल्टर'