'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. या मालिकेतील अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
वीणा जगताप 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्येही झळकली. या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली पहायला मिळाली. बिग बॉसमुळे वीणाचा मोठा चाहतावर्ग बनला.
बिग बॉसपासून वीणा कायम चर्चेत असते. अशातच वीणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वीणानं नवं फोटोशूट केलं असून इन्स्टाग्रामवर तिने हे फोटो शेअर केले आहेत.
वीणाचं नवं फोटोशूट साडीमधील असून तिचं साडीप्रेम हे वारंवार पहायला मिळतं. नव्या फोटोशूटमधूनही ते प्रकर्षानं दिसून आलं.
वीणाच्या या नव्या फोटोशूटला नेहमीप्रमाणे चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. फोटोंवर कमेंट लाईक्सचा पाऊस होताना दिसतोय.
वीणा जगताप सध्या स्टार प्रवाहावरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत 'अवंतिका कानिटकर' हे पात्र साकारताना दिसत आहे.
वीणाच्या 'अवंतिका' पात्राला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. तिच्या अभिनयानं ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.