'भाभीजी घरपर है' मालिकेच्या माध्यमातून अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे.
चाहते सतत अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक असतात. दरम्यान शुभांगीच्या चाहत्यांना नाराज करणारी एक बातमी समोर आली आहे.
लग्नाच्या तब्बल 19 वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वानांच धक्का बसला आहे.
शुभांगीने 2003 मध्ये पियुष पुरे या मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे.
याबाबत बोलताना शुभांगी म्हणाली, आम्ही आमचं लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र आम्ही आमचं नातं वाचविण्यात अपयशी ठरलो. परस्पर मतभेदांमुळे आम्ही विभक्त झालो'.