'भाभीजी घरपर है' या मालिकेतून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शिल्पा शिंदे घराघरात पोहोचली होती.ही अभिनेत्री आजही अविवाहित आहे. लग्न न करण्याच्या निर्णयाबाबत ती म्हणते की, 'ती रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करत नाही. ती तिच्या आयुष्यात एक सोबती म्हणून कोणत्याही व्यक्तीकडे पाहत नाही.
शिल्पा शिंदेला आज प्रत्येक घराघरात ओळखलं जातं. 'भाभी जी घर पर हैं' पासून ते 'बिग बॉस 11' आणि 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या स्टँड-अप कॉमेडी शोमध्येपर्यंत अभिनेत्रीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.
काही वर्षांपूर्वी तिने अभिनेता रोमित राजसोबत साखरपुडा केला होता. पण हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अलीकडेच, अभिनेत्रीने आपल्या सिंगल असण्याबद्दल खुलासा करत 'मी सिंगल आहे याचा आनंद आहे' असं मत व्यक्त केलं आहे.
रोमित राजसोबतच्या नात्याबद्दल बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली की, 'मी त्यावेळी खूप लहान होते आणि त्यावेळी मला लग्न करायचं नव्हतं. पण माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाला वाटत होतं की लग्न करण्यासाठी हेच योग्य वय आहे.
यानंतर रोमित आणि माझा साखरपुडा झाला. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. माझा साखरपुडा मोडल्यानंतर मी दुसरं नातं जोडलं, पण तो खूप वाईट अनुभव होता'.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'त्या वाईट अनुभवानंतर मी माझ्या कानाला खडा लावला आणि विचार केला की आता मी रिलेशनशिपपासून दूर राहीन. मला हे उमगलं आहे की, मी अविवाहित राहून आनंदी आहे.
मी कोणालाही उत्तर देत बसू शकत नाही. कारण जेव्हा मी काम करत असते आणि कोणी मला विचारतं की मी कुठे जात आहे किंवा मी काय करत आहे, तेव्हा मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही.
रिलेशनशिपबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की, 'आज मला बरीच नाती तुटताना दिसत आहेत. मला समजत नाही की 10 वर्षे चाललेलं नातं का चालत नाही. कदाचित इंकम्पॅटिबलिटी हे एक कारण असावं.