'बाहुबली' या चित्रपटातून शिवगामी अर्थातच अभिनेत्री राम्या कृष्णन जगभरात लोकप्रिय झाली होती. चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
राम्या कृष्णन नुकतंच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या 'लायगर' या चित्रपटात झळकली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतंच राम्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर अशा साडीमध्ये दिसून येत आहे.
परंतु हे फोटो पाहून एक वेगळीच चर्चा सुरु आहे. फोटो पाहून राम्याची नव्हे तर तिच्या साडीची प्रचंड चर्चा होत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्रीने सिल्क आई वेलवेटची सुंदर साडी नेसली आहे. या साडीने राम्याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राम्याची ही साडी प्रचंड महाग आहे. या साडीची किंमत तब्बल 1 लाख 25 हजार इतकी आहे.
आपल्या किंमतीमुळे राम्याची साडी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अभिनेत्री सतत असे महागडे आऊटफिट्स परिधान करत असते.