या नव्या वर्षात बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु होणार असून यंदाच्या लग्नाच्या सीझनची सुरुवात बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाने होणार असल्याचं दिसत आहे.
या जोडप्याचं लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे आणि आता अखेर या सेलिब्रेटी कपलच्या लग्नावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
मात्र, अद्याप अथिया किंवा राहुलकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.दरम्यान असा अंदाज वर्तवला जात आहे की, या शाही लग्नाची अधिकृत घोषणा 20 जानेवारीच्या आसपास केली जाऊ शकते.
अथिया-केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान,अभिनेते सुनील शेट्टी आपल्या लाडक्या मुलीचं लग्न कुठे करणार?असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
नुकतंच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील आलिशान बंगल्यात अथिया आणि केएल राहुल लग्नगाठ बांधणार आहेत.
खंडाळ्यात सुनील शेट्टी यांचा अतिशय भव्य बंगला आहे. जिथे अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. याठिकाणी जोडप्याचा विवाह सोहळा 3 दिवस चालणार आहे.
खंडाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात बांधलेल्या या बंगल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या बंगल्यामध्ये अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.