बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अंशुला कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाहीय. तरीसुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच लोकप्रिय बनली आहे. अंशुलाबाबत विविध गोष्टी जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. भावाप्रमाणे अंशुला आपल्या लव्ह लाईफमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरची बहीण रोहन ठक्कर या व्यक्तीला डेट करत असल्याचं सांगितलं जातं. अंशुलासुद्धा सतत सोशल मीडियावर रोहनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. मात्र अद्याप तिने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाहीय. अर्जुनच्या बहिणीचा रुमर्ड बॉयफ्रेंड रोहन ठक्कर एक फिल्ममेकर आहे. रोहन ठक्करने बॉलिवूडमध्ये काम केलेलं नाहीय. परंतु त्याने विविध भाषेत स्क्रीन रायटिंग केलं आहे.