बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा होय. या दोघांची जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लोक सतत त्यांच्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक असतात. नुकतंच मलायका आणि अर्जुन आपल्या कामातून वेळ काढत विदेशात व्हेकेशनसाठी पोहोचले होते. अर्जुन कपूरने आपल्या बर्लिन ट्रीपचे अनेक फोटो आता इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन मलायकासोबत सुंदर क्षणांचा आनंद घेताना दिसून येत आहे. मलायका अर्जुनने थेट लिफ्टमध्ये फोटोशूट करत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. अर्जुन आणि मलायकाचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहेत.