'बाहुबली'मध्ये 'देवसेना'ची भूमिका साकारून आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने अभिनेत्री अनुष्का शेट्टीने प्रेक्षकांची मने जिंकली. अशातच अनुष्का शेट्टी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
'बाहुबली'मध्ये 'देवसेना'ची भूमिका साकारून आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने अभिनेत्री अनुष्का शेट्टीने प्रेक्षकांची मने जिंकली. अशातच अनुष्का शेट्टी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/ 9
7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगलोरमध्ये जन्मलेल्या अनुष्का शेट्टीने मनोरंजन विश्वात खूप नाव कमावले आहे. तिला तामिळ आणि तेलगू चित्रपटांची राणी म्हटले जाते. करिअरसोबतच अनुष्का लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिली आहे.
3/ 9
प्रभासमुळे अनुष्काने आपलं लग्न थांबवलं होत. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टी आणि प्रभासचा हा किस्सा जाणून घेऊया.
4/ 9
'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' मध्ये एकत्र काम केलेल्या प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रभास आणि अनुष्काचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहिल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या सगळीकडे आल्या होत्या.
5/ 9
'बाहुबली'चा नायक प्रभासने अनुष्काचे खऱ्या आयुष्यात लग्न थांबवले होते. खरे तर चित्रपटादरम्यानच अनुष्काचे लग्न कुठेतरी निश्चित झाले होते, मात्र अभिनेत्रीने प्रभासमुळे हे लग्न थांबवलं होतं. यामागे मोठे कारण होते.
6/ 9
प्रभासमुळे अनुष्का शेट्टीने लग्न थांबवण्यासारखे पाऊल उचलण्यामागे प्रेम नसून व्यावसायिक कारण होते.
7/ 9
खरे तर प्रभासने या बाहुबली चित्रपटासाठी तीन वर्षे दुसरा कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. त्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली होती आणि अनुष्कानेही या प्रोजेक्टवर गांभीर्याने काम करावे अशी त्याची इच्छा होती.
8/ 9
जेव्हा अनुष्काच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिने ते होऊ दिले नाही कारण तिला विश्वास होता की त्यानंतर अनुष्का 'बाहुबली' चित्रपटावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही.
9/ 9
बाहुबली चित्रपटातील दोघांमधील बॉन्डिंग आणि केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले. तसेच, प्रभास आणि अनुष्का एकमेकांना खरोखर आवडतात आणि ते लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र दोघांनीही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं अनेकवेळा सांगितलं आहे.