बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला आता कोणत्याही दुसऱ्या ओळखीची गरज नाही. फारच कमी वयात आलियाने अफाट लोकप्रियता आणि पैसा मिळवत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र सिनेमांमध्ये येण्याआधी आलिया अली दादरकरला डेट करत होती. पहिला सिनेमा हिट ठरताच आलियाचं सिद्धार्थ मल्होत्रासोबत सूत जुळलं आणि तिने अलीसोबतच्या नात्याचा शेवट केला. आलियाने रणबीर कपूरसोबत संसार थाटला असून एका लेकीची आई बनली आहे.
दीपिका पादुकोणने आपल्या सिने करिअरमध्ये पैसा तर मिळवलाच शिवाय अफाट लोकप्रियताही मिळवली आहे. दीपिका आज एक आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. रणवीर सिंगसोबत लग्नाआधी दीपिका पादुकोण अनेकवेळा प्रेमात पडली आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल की, दीपिका सुरुवातीला निहार पांड्याला डेट करत होती. परंतु इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळताच तिने निहारसोबतचं नातं तोडल्याचं म्हटलं जातं. त्यांनंतर ती रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
अभिनेत्री अनुष्का शर्माचं नाव बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणलं जातं. तिने अनेक हिट चित्रपट देत आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.तिने जगातील लोकप्रिय क्रिकेटर्सपैकी एक असणाऱ्या भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं आहे. विराटपूर्वीही अनुष्का प्रेमात पडली होती. मॉडेलिंगच्या सुरुवातीला अनुष्का शर्माचं अफेयर जोहेब युसूफसोबत होतं. परंतु तिनेही पैसा आणि प्रसिद्धी मिळताच बॉयफ्रेंडला सोडून दिल्याचं सांगितलं जातं.
सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयसोबतचं ऐश्वर्या रॉयचं नातं जगजाहीर आहे. परंतु या दोघांपूर्वीही ऐश्वर्या प्रेमात पडली होती. मॉडेलिंग काळात अभिनेत्री मॉडेल असणाऱ्या राजीव मुलचंदानीला डेट करत असल्याचं म्हटलं जातं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परंतु सिने इंडस्ट्रीत आल्यांनतर अभिनेत्रीची सलमानसोबत जवळीकता वाढत गेली आणि तिने राजीवसोबतचं नातं तोडून टाकलं होतं.
प्रियांका चोप्राने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. निक जोनससोबत संसार थाटण्यापूर्वी अभिनेत्री अनेकवेळा रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. प्रियांका आपला मॅनेजर असीम मर्चंटसोबतसुद्धा रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अभिनेत्रीने इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळू लागताच त्याला सोडून दिल्याचं म्हटलं जातं.