मराठी मालिका आई कुठे काय करतेचा हिंदी रिमेक असलेली अनुपमा मालिका मराठी इतकीच लोकप्रिय आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच नंबर वन राहिली आहे. मालिकेत अनुपमाची भूमिका रूपाली गांगुली साकारताना दिसत आहे. अनुपमाची भूमिका सर्वात लोकप्रिय भूमिका आहे. प्रेक्षक देखील मालिकेतील प्रत्येक कलाकारावर भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेत गौरव खन्ना अनुज कपाडियाची भूमिका साकरताना दिसतो. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडते. रूपालीसोबत गौरवचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे.