टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतंच आपल्या लग्नानंतर च्या पहिल्या रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने आपल्या सासुरवाडीत मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला आहे. यामध्ये अंकिता लोखंडे पती नणंदेसोबत मजामस्ती करताना दिसून येत आहे. अंकिता लोखंडेने आपल्या नव्या घरात रक्षाबंधन सेलिब्रेट केला आहे. यावेळी तिच्या सासरची संपूर्ण मंडळी उपस्थित होती. अंकिताने या खास दिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताने निळ्या रंगाची काठपदर साडी परिधान केली आहे. या पारंपरिक लुकमध्ये अंकिता एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.