'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेमुळे अंकिताला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. अंकिता ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. नवनवीन फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अंकितानं नुकतंच एक फोटोशूट केलं असून ते फोटोशूट चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे. अंकिताचं नवं फोटोशूट बाथटबमधील आहे. यामध्ये तिनं मादक पोझ देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोंमध्ये तिनं आकाशी कलरचे कपडे घातल्यातं दिसतंय. अंकिताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. तिच्य प्रत्येक फोटोंवर चांगल्या वाईट प्रतिक्रिया या येताना दिसतात. अंकिताचं विकी जैनसोबत लग्न झाल्यापासून दोघेही सतत चर्चेत असतात. दोघांनाही सोबत पाहणं त्यांचे चाहते पसंत करतात. त्यामुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.