सगळीकडे गणेशोत्सवाचं आनंदमय वातावरण असताना अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनच्या घरीही बाप्पांचं आगमन झालं आहे.
अंकितानं इन्स्टाग्रामवर विकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. लग्न झाल्यानंतर दोघांचा सोबत पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे दोघांसाठीही हा उत्सव खूपच खास आहे.
त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
अंकिता आणि विकीचे लग्न 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न पार पडलं. तेव्हापासून दोघे सतत चर्चेत असतात. लग्नानंतर दोघांनी मुंबईत आलिशान अपार्टमेंटही खरेदी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंकिता प्रेग्नेंट असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र तिनं अद्याप बाळ करणार नसल्याचं सांगितलं.