हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
चंद्रमुखीच्या प्रमोशनदरम्यान अमृता जोरदार चर्चेचा विषय ठरत होती. या चित्रपटामुळे तिची 'चंद्रा' अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.
अमृतानं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा ग्लॅमरस लुक आणि मादक अदा चाहत्यांना घायाळ करत आहे.
अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे नवे फोटो शेअर केले आहेत. अगदी काही क्षणातच तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले.