बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कुटुंबापैकी एक म्हणजे बच्चन कुटुंब होय. बच्चन कुटुंबातील जवळजवळ सर्वच लोक सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. परंतु अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि अभिषेकची बहीण श्वेता बच्चन मात्र इंडस्ट्रीपासून दूर आहे. श्वेता बच्चन फारच कमी मीडियासमोर येते. श्वेताने निखिल नंदासोबत लग्नगाठ बांधली आहे. अमिताभ बच्चन यांचा जावई असणारा निखिल नंदा एक नामांकित उद्योजक आहे. उद्योग जगतात अभिषेकचे भावोजी निखिल नंदा यांचं फार मोठं नाव आहे. श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचं 1997 मध्ये लग्न झालं होतं. या दोघांना नव्या नंदा आणि अगत्स्य नंदा अशी एक मुलगा आणि मुलगी आहेत.