महालक्ष्मीने दुसरं लग्न साऊथचे निर्माते रवींद्र चंद्रशेखरनसोबत केलं असून यामुळे ती चांगलीच ट्रोल होत असते.
लग्नाच्या चार महिन्यानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करत तिचं आयुष्य कसं बदललं आहे याविषयी सांगितलं.
अभिनेत्री महालक्ष्मीने पती रवींद्रसोबतचा तिचा लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांमधील अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट 'विद्युम वरई कथिरू' चित्रपटादरम्यान झाली होती. याच्या सेटवर दोघांमधील जवळीक वाढली होती. त्याच्याशी लग्न केल्याबद्दल अभिनेत्रीने स्वतःला भाग्यवान म्हटले होते.
महालक्ष्मी ही साऊथ टीव्ही मालिकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'ऑफिस', 'थिरु मंगलम', 'केलाडी कानमानी', 'यामिरुक्का बायमेन', 'अरासी', 'वाणी रानी' आणि 'चेल्लामय' यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. यासोबतच रवींद्रने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.