अभिनेत्री श्वेता अग्रवालचं बेबीशॉवर, पती आदित्य नारायणने शेअर केले PHOTO
बॉलिवूड अभिनेता, होस्ट आणि गायक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल लवकरच आईबाबा बनणार आहेत.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेता, होस्ट आणि गायक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल लवकरच आईबाबा बनणार आहेत.
2/ 8
आदित्य आणि श्वेताने नुकतंच आपल्या सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली होती. त्यांनतर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
3/ 8
दरम्यान आज आदित्य नारायणने आपले आणि पत्नी श्वेताचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बेबीशॉवरचे असल्याचं दिसून येत आहे.
4/ 8
आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये श्वेता समोर बसली आहे. तर आदित्य तिच्या मागे उभा आहे.
5/ 8
या फोटोंमध्ये आदित्य आणि श्वेताने सुंदर असा व्हाईट कलरचा पोशाख परिधान केला आहे. सोबतच आदित्यने कॅप्शनमध्ये बेबीशॉवर असं लिहिलं आहे.
6/ 8
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायणने म्हटलं होतं, 'आम्ही या टप्प्यात येऊन फारच आनंदी आहोत'. मला आणि श्वेताला नेहमीच याची उत्सुकता होती'.
7/ 8
'मला बाबा बनायचं होतं.मला आणि श्वेताला लहान मुले फार आवडतात. परंतु आता श्वेताचं काम डबल होणार आहे. कारण मी स्वतः एखाद्या लहान मुलापेक्षा कमी नाही'. असं आदित्यने म्हटलं आहे.
8/ 8
'श्वेता हातात आपल्या बाळाला घेऊन उभी आहे'आदित्यने 2017 मध्ये आपल्या 30 व्या वाढदिवसाला श्वेताजवळ ही इच्छा व्यक्त केली होती.