सविता भाभींचा अॅनिमेटेड चित्रपट करून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री रोजलिन खानशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे की ती कॅन्सरशी झुंज देत आहे. रोजलिनने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि एक लांब पोस्ट लिहिली आहे.
रोजलिन खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे "कर्करोग... कठीण लोकांचे जीवन सोपे नसते हे कुठेतरी वाचले होते. पण आता मला माहित आहे की हे माझ्यासारख्या लोकांसाठी आहे...".
रोजलिन खानने पुढे लिहिले, "देव त्याच्या सर्वात बलवान सैनिकांना सर्वात कठीण लढाया देतो. विश्वास आणि आशा ठेवून हा माझ्या आयुष्यातील एक अध्याय असू शकतो...".
प्रत्येक धक्का मला मजबूत बनवतो. मी आणखी मजबूत होईन. माझ्यासाठी प्रार्थना करणारे सुंदर लोक आहेत. जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते आणि ते चांगलेच असते. मला मान आणि पाठीच्या तीव्र वेदनांशिवाय कोणतीही समस्या नव्हती. मी ते जिम्नॅस्टिक वेदना आणि पाठदुखी समजण्याची चूक केली. बरं, लवकरच कळलं, असंही रोजलिन म्हणाली.
ब्रॅंडविषयी रोजलिनने लिहिलं, मी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्यासोबत शूट करायला तयार आहे. कारण येत्या 7 महिन्यांत मला केमोथेरपीसाठी जावे लागेल. प्रत्येक केमोथेरपीनंतर मला आठवडाभर विश्रांतीची आवश्यकता असेल. टक्कल असलेल्या मॉडेल्ससह शूट करण्यासाठी तुम्हाला हिंमत आवश्यक आहे.
PETAसाठी फोटोशूट करून रोजलिन खान चर्चेचा केंद्रबिंदू बनली होती. याशिवाय तिनं अनेक चित्रपट, मालिका आणि गाण्यांमध्ये काम केले आहे. तिने अनेक आयटम नंबरही केले आहेत.