या टॉक शोमध्ये अदितीने आपल्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शेअर केल्या. वयाच्य 21 व्या वर्षी अदितीचं अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न झालं होतं. पण अगदी थोड्याच काळात दोघं वेगळी झाली. याबद्दल बोलताना अदिती म्हणाली की, ‘वयाच्या 21 व्या वर्षी जर तुम्ही अशा नात्यात आला असाल तर तुमचा डेटिंग स्कोअर शुन्यच असेल ना... डेट कसं करतात हे मला माहीत नाही बहुधा...’