मराठी मनोरंजन विश्वातील स्टनिंग आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी प्राजक्ता माळी एक आहे. ती सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एक साडी लुक तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- prajakta_official/Instagram)
अभिनेत्रीने शेअर केलेल्या माहितीनुसार तिने यावेळी केशरी रंगाची एक आसामी सिल्क साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसते आहे (फोटो सौजन्य- prajakta_official/Instagram)
अभिनेत्रीने यावेळी शेअर केलेल्या काही फोटोंना 'शारद सुंदर चंदेरी राती…थंड या हवेत घेऊन कवेत…' अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या ट्रेडिशनल पण बोल्ड लुकवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान जरी प्राजक्ताच्या या फोटोंचे कौतुक होत असले तरी काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिच्या या लुकबाबत भलत्याच कमेंट्स केल्या आहेत. 'ब्लाउज कुठे आहे?', 'ब्लाउज घालायला विसरली का?', अशा आशयाच्या कमेंट्स काहींनी केल्या आहेत.
साडीवर ब्लाऊज न परिधान करणं ही कसली फॅशन असा सवाल चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे काही जणांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे
असे असले तरी सर्वाधिक कमेंट्स कौतुकाच्याच आहेत. 'तू खूप गोड दिसते आहेस', 'क्रश', 'छान दिसत आहे या साडीमध्ये', 'तू माझी ड्रीम गर्ल आहेस' अशा काही कमेंट्स तिच्या फोटोंवर येत आहेत
‘जुळून येती रेशीम गाठी’ या मराठी मालिकेमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आली. 'हंपी', 'पावनखिंड', 'पांडू', 'खो-खो' या सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते.