लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. लग्नाच्या दिवशी ती अगदी आतूरतेने आपल्या नवरदेवाची वाट पाहत असते. मात्र जर सजलेल्या मंडपात वरात आलीच नाही, तर त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अशीच घटना समोर आली आहे. येथे हुंडा न दिल्यामुळे सजलेल्या मंडपात वरात आली नाही. वरात आली नाही म्हणून नवरी घरातून निघून गेली. यानंतर अख्खं घर उद्ध्वस्त झालं.
या प्रकरणात मृत व्यक्तीची मोठी मुलगी प्रीती देवी हिचा आरोप आहे की, मनोहर पोलीस ठाणे हद्दीतील हमीरपूर येथील निवारी छैदू यांच्यासोबत लग्न ठरलं होतं. मात्र ते वरात घेऊन आले नाही. ज्यामुळे वडील निराश झाले. त्यातच लग्नाच्या दिवशी सायंकाळी जंगलात गेलेली मुलगी अचानक गायब झाली. रात्री उशिरा मुलगी घरी आली नाही म्हणून वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.