चित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका फार्ममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांने तिच्या प्रियकराला नोकरीवरुन काढून टाकण्याच्या रागात कारखान्याचं युनिट जाळण्याचा प्रयत्न केला
2/ 5
5 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता हा प्रकार घडला. मायाबेन परमान या 24 वर्षीय तरुणीने लायटरचा वापर करून फॅब्रिकला पेटविण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी आग पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने विझवली.
3/ 5
घटनेनंतर आगीचं कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी तरुणीने आग लावल्याचा खुलासा झाला.
4/ 5
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनम इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी वापरलेल्या कपड्यांची क्रमवारी लावले व त्याच्या पुनर्वापराचं काम करते. कंपनीने तरुणाला असं करण्यामागचं कारण विचारलं होतं.
5/ 5
यावेळी तरुणी म्हणाली की तिच्या प्रियकराला काढून टाकल्यामुळे ती नाराज होती. प्रियकराचा सूड घेण्यासाठी प्रेयसीने युनिट जाळण्याचं ठरवलं. दरम्यान तरुणीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.