advertisement
होम / फोटोगॅलरी / क्राइम / गँगस्टर अतिक अहमदची गोळीबारात हत्या; माफियाचे आतापर्यंतचे गुन्हे

गँगस्टर अतिक अहमदची गोळीबारात हत्या; माफियाचे आतापर्यंतचे गुन्हे

गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

01
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी संध्याकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण यूपी हादरून गेली आहे. अशरफ आणि अतिक याच्या हत्येच्या काही तासांपूर्वी अतीक अहमदचा मुलगा असद यालाही यूपी पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. शनिवारीच अतिकचा मुलगा असद याला दफन करण्यात आले होते. मुलाच्या दफनविधीच्या काही तासांनंतर, अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली.

02
माफिया अतिक अहमद याच्यावर 1979 मध्ये खुनाच्या आरोपाखाली पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 1989 रोजी अतिकवर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माफिया चांद बाबाची हत्या केल्याचा आरोप होता. 1996 मध्ये प्रयागराज येथील व्यापारी अशोक साहू यांची हत्या केल्याचा आरोपही अतिकवर होता, ज्याने त्याचा भाऊ अशरफच्या गाडीला ओव्हरटेक केले होते.

03
25 जानेवारी 2005 रोजी बसपा आमदार राजू पाल यांचा भरदिवसा खून केल्याचा आरोप झाला. 28 फेब्रुवारी 2006 रोजी, राजू पाल खून खटल्यातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला त्याच्या साक्षीशी संबंधित प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करायला लावली. 2007 मध्ये अतिकने सोनिया गांधी यांच्या नातेवाईकाची मालमत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, पीएमओच्या नाराजीनंतर ताबा सोडला.

04
2012 मध्ये अतिकच्या भीतीमुळे, 10 न्यायाधीशांनी त्याच्या खटल्याच्या सुनावणीपासून स्वतःला दूर केले. 2018 मध्ये अतिक अहमदवर लखनऊमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला देवरिया तुरुंगात नेऊन मारहाण केल्याचा आरोप होता. यूपीच्या तुरुंगात असतानाही अतिक तुरुंगातूनच आपला गुन्हेगारी व्यवसाय चालवत होता. अतिक अहमदवर कारवाई करण्यासाठी त्याला गुजरातमधील साबरमती कारागृहात हलवण्यात आले.

05
2019 मध्ये अतिक अहमद याने वाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. गुजरातच्या साबरमती कारागृहातूनही अतिकच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. 24 फेब्रुवारी 2023 रोजी राजू पाल खून प्रकरणाचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्यासह त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन हवालदारांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर झाला.

06
आता 28 मार्च रोजी, 2006 मधील उमेश पाल अपहरण प्रकरणात MP-MLA न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी अतिक अहमदला आज साबरमतीहून प्रयागराजला नेले जात आहे. अहमद हे समाजवादी पक्षाचे (एसपी) माजी खासदार असून जून 2019 पासून साबरमती तुरुंगात आहेत. उत्तर प्रदेशातील तुरुंगात असताना रिअल इस्टेट बॅरन मोहित जैस्वाल यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने त्याचं स्थानांतर केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी संध्याकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण यूपी हादरून गेली आहे. अशरफ आणि अतिक याच्या हत्येच्या काही तासांपूर्वी अतीक अहमदचा मुलगा असद यालाही यूपी पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. शनिवारीच अतिकचा मुलगा असद याला दफन करण्यात आले होते. मुलाच्या दफनविधीच्या काही तासांनंतर, अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement