येरवडा येथे अज्ञात कोयता माजी नगरसेविकेच्या घरासमोर लावलेल्या चार चाकी गाड्यांची रात्रीच्या वेळी तोडफोड केली.
तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी सुभाष उर्फ पापा राठोड, अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांचा चव्हाण गँगनी धारधार हत्याराने मर्डर केला होता.
त्यातील तीन आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली होती. त्या रागातून खून झालेल्या राठोड गटातील तरुणानी रात्रीच्या अंधारात गाड्या फोडल्याचा संशय येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तिघांविरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार चार चाकी, रिक्षा, दुचाकी या गाड्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी नुकताच जामीनवर सुटलेल्या शंकर माणू चव्हाण यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.