रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना : डोळ्यासमोर कारला आग लागून पत्नी जळून खाक झाल्याचा बनाव पतीनच केला आणि चौकशीदरम्यान तो फसला. पोलिसांच्या चौकशीमध्ये पाच दिवसांनंतर एक मोठं गूढ समोर आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आहे.
मूल होत नसल्याच्या रागातून पत्नीला घटस्फोट देण्यासाठी भाग पाडलं. मात्र पत्नी आपल्या मतावर ठाम असून ती घटस्फोट देत नाही हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने पत्नीलाच जिवंत जाळलं.
मूल होत नसल्यामुळं पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक सत्य तपासात समोर आलं. कारमध्ये जळून मृत्यू झालेल्या विवाहितेच्या घातपाताचा उलगडा अखेर पाच दिवसांनी झाला.
तळणी-मंठा रोडवर कारला आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती.
त्यांना मुलबाळ होत नव्हतं, अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत असे. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत असे.. मात्र त्याला सविता नकार देत होती. याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं.
अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली..दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केलाय...