देशात डिजिटल व्यवहार वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. तुमच्यासोबत अशी घटना घडल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. ऑनलाइन फसवणुकीवर त्वरित कारवाई केल्याने अनेक वेळा रिफंड मिळणे सोपे होते. फसवणूक झाल्याची तक्रार तुम्ही ताबडतोब बँकेला द्यावी. (फोटो: न्यूज18)
तुम्ही स्थानिक पोलीस आणि सायबर क्राईम शाखेत ऑनलाइन फसवणुकीची तक्रार करू शकता. घटनेच्या 3 दिवसांच्या आत तुम्ही पोलिसात फसवणुकीची तक्रार नोंदवावी. तुम्ही यासाठी ऑनलाइन तक्रारही दाखल करू शकता. (फोटो: न्यूज18)
ऑनलाइन फसवणुकीची तक्रार करण्यासाठी तुम्ही सरकारची अधिकृत वेबसाइट https://www.cybercrime.gov.in/ वापरू शकता. तुम्ही तुमच्या बँक आणि पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार ताबडतोब केल्यास 7-10 दिवसांत तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत येऊ शकतात. (फोटो: न्यूज18)
अनेकवेळा अशा ऑनलाइन फसवणुकीत वापरकर्त्याचा दोष किंवा निष्काळजीपणा असतो. जर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी इत्यादी कोणाला शेअर केला असेल तर रिफंड मिळणे खूप कठीण आहे. (फोटो: न्यूज18)
या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती जसे की क्रेडिट कार्ड नंबर, UPI पिन इत्यादी कधीही कोणाशीही शेअर करू नये. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी वगैरे कोणालाही सांगू नये. (फोटो: न्यूज18)