दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबल उडवली आहे. नुकतंच या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे.
दर्शना पवार मृत्यू प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्टेशनहून ताब्यात घेतले. दर्शनाची हत्या केल्याचं राहुलने पोलिसांसमोर कबुल केलं आहे.
सकाळी 8.30 वाजता राहुल-दर्शनाने राजगड चढण्यास सुरुवात केली होती. मात्र साधारण 10.45 राहुल एकटाच खाली परतला. या काळात त्याने दर्शनाची अत्यंत निघृणपणे हत्या केली.
दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील विविध भागात फिरत होता. याशिवाय तो अधून-मधून घरातल्यांना फोन करत होता.