पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी ते विद्येच माहेरघर अशी मोठी सांगितली जाते. मात्र, या शहरात जशी कालानुरूप स्थित्यंतर झाली तशीच त्याचे काही दुष्परिणामही समोर यायला लागले आहेत. शाळेपासून ते महाविद्यालयांमध्ये होणार अंमली पदार्थाच सेवन हा चिंतेचा विषय आहे. त्यात अगदी भारतात उपलब्ध नसणाऱ्या कॅथा इडूलिस काट या अंमली पदार्थाचही सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (वैभव सोनवणे, प्रतिनिधी)
आफ्रिकेत आढणाऱ्या ह्या अंमली पदार्थाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेली दीड लाख रूपयाची पावडर अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेने राज्यातली पहिली कॅथा इडूलिस काटची कारवाई केली आहे.
पुण्याच्या गुन्हे शाखेने गेल्या तीन वर्षात केलेल्या आकडेवारीनुसार नजर टाकली तर अंमली पदार्थाच्या सेवनाचा वाढता ट्रेंड लगेच लक्षात येतो.
कॅथा इडूलिस काट ही वनस्पती प्रामुख्याने अरेबियन देशांमध्ये कमी पाण्याच्या भागात घेतली जाते. याला सदाहरीत झाड किंवा Celastraceae कुटुंबाचे झुडप म्हणतात, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबियन दीपकल्पातील मूळ कडू चवीची पाने आणि कोवळ्या कळ्या कॅथिनोन आणि कॅथिन या उत्तेजक घटकांसाठी चघळल्या जातात, ज्यामुळे सौम्य उत्साह निर्माण होतो. युरोप, युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये ही वनस्पती आणि कॅथिनॉन हे नियंत्रित पदार्थ मानले जातात.
अंमली पदार्थाच्या वाढत्या कारवायांमुळे अंमली पदार्थाच सेवन किती मोठ्या प्रमाणात वाढतय याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. अंमली पदार्थांचा हा भस्मासूर अगदी आपल्या दारापर्यंत येऊन थांबलाय जे अत्यंत गंभीर आहे.