दारुच्या नशेत दोन तरुणांनी वाहनांची तोडफोड केली आहे. आमच्या सनी भाईला का मारला म्हणत तरुण तोडफोड करत होते.
आरोपींनी कोयते हातात घेत गाड्यांची तोडफोड करत परीसरात दहशत माजवली होती. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरीकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहू नये म्हणून या आरोपींची परिसरात धिंड काढली.
अल्ताफ बाबू शेख आणि सोमनाथ देवराम गडदे ही आरोपींची नावं आहेत. चिखली पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत यांना अटक केली.