

33 वर्षांच्या खटेरा या महिला पोलिसावर क्रूर असा हल्ला करण्यात आला आहे. नोकरी करते म्हणून आधी चाकूनं तिचे डोळे काढून तिला आंधळं केलं आणि त्यानंतर तिच्यावर गोळी झाडली. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं ज्यामुळे तिचा जीव वाचला आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


रॉयटर्सच्या वृत्तानुसार खटेरा ही गजनी प्रांतातील एका पोलीस ठाण्यात नोकरी करते. तीन महिन्यांपूर्वीच क्राईम ब्रांचमध्ये अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


हल्ल्याबाबत सांगताना खटेरा म्हणाल्या, मला पोलीस अधिकारी होऊन फक्त तीन महिने झाले आहेत आणि माझ्यावर असा हल्ला करण्यात आला आहे. आपले वडील आपल्या नोकरीच्या विरोधात होते. अनेकदा ड्युटीवर जाताना ते आपल्या मागून यायचे. त्यांनी जवळच्या परिसरातील तालिबानशी संपर्क करून मला नोकरीवर जाण्यापासून रोखण्यास सांगितलं होतं, असं या पोलीस महिलेनं सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


गजनी पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लामागे तालिबानचा हात आहे. खटेराच्या वडिलांनाही हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)