advertisement
होम / फोटोगॅलरी / क्राइम / अधिकाऱ्यांची बोट पाहिली अन् 20 कोटींचं सोनं फेकलं समुद्रात, रिअल लाईफ KGF PHOTOS

अधिकाऱ्यांची बोट पाहिली अन् 20 कोटींचं सोनं फेकलं समुद्रात, रिअल लाईफ KGF PHOTOS

केजीएफ चित्रपटाप्रमाणे 20.2 कोटी रुपयांचे तस्करीचे सोने समुद्रात फेकण्यात आले होते. पण नंतर हे फेकलेले सोने स्कूबा डायव्हर्स यांनी परत मिळवले आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊयात. (बी. मनोज कुमार, प्रतिनिधी)

01
समुद्रमार्गे रामेश्वरमच्या मंडपम भागातून बोटीतून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्तपणे कारवाई केली.

02
त्यांच्या ऑपरेशनचा एक भाग म्हणून त्यांना रामेश्वरम परिसरात जवळच्या बेटावर एक अनोळखी बोट उभी असल्याचे दिसले.

03
अधिकाऱ्यांना पाहताच बोटीच्या क्रू मेंबर्सनी अचानक एक पार्सल समुद्रात फेकले. क्रू मेंबर्सची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले.

04
तसेच यासोबतच काल त्या अज्ञात बोटीच्या तीन क्रू मेंबर्सनी समुद्रात फेकलेल्या वस्तू ओळखण्यासाठी स्थानिक मच्छिमारांसह स्कूबा डायव्हर्सची एक टीम कामाला लागली.

05
दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरूच होते आणि शेवटी ऑपरेशन सुरूच राहिल्याने स्कुबा डायव्हर्सनी पार्सल परत मिळवले.

06
सूत्रांनी पुष्टी केली की, पार्सलमध्ये अंदाजे 20.2 कोटी रुपयांचे सोने होते आणि त्याचे वजन 32.689 किलोग्रॅम होते. तसेच हे सोने श्रीलंकेतून भारतात आणले जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

07
दरम्यान, याप्रकरणी तीन क्रू मेंबर्सना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहे, ज्यामध्ये डीआरआय अधिकाऱ्यांनी 17.74 किलो सोने असलेली बॅग जप्त केली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • समुद्रमार्गे रामेश्वरमच्या मंडपम भागातून बोटीतून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्तपणे कारवाई केली.

    MORE
    GALLERIES