ब्रिटेनची ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लशीवर संपूर्ण जगातं लक्ष आहे. या लशीचं ट्रायल शेवटच्या टप्प्यात असून express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार अवघ्य 42 दिवसांत म्हणजेच 6 आठवड्यात कोरोनाची लस तयार होऊ शकते.
2/ 6
express.co.uk मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार ब्रिटेनच्या सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि इंपेरियल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक लस तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत.
3/ 6
ब्रिटनमध्ये लशीच्या उत्पादनाची तयारी पहिल्यापासून सुरू आहे. वैज्ञानिकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ब्रिटनमध्ये नागरिकांना अत्यंत कमी वेळात लस मिळू शकेल. मात्र अद्याप ब्रिटेनच्या मंत्र्यांनी मोकळेपणाने यावर काही वक्तव्य केलंल नाही.
4/ 6
संडे एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितले की सर्वाच चांगल्या स्थितीत 6 आठवड्यात लशीची तपासणी पूर्ण होऊ शकते. असे झाल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची आशा आहे.
5/ 6
ब्रिटेनचे लशीच्या टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले की, लशीबाबत सावधान आहोत, आणि आशावादीदेखील. ते म्हणाले की सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण काम करीत राहायला हवं.
6/ 6
आततायीपणे कुठल्याही गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचायला नको. ते पुढे म्हणाले आम्हाला आशा आहे की नाताळाच्यापूर्वी लशीच्या ट्रायलचा निकाल समोर येईल.