ठाणे, 2 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीनंतर आता दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) ही जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कुणाला किती टक्के पडले, कोण बोर्डात आलं यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. अशीच चर्चा ठाण्यातील विशाल कराड या विद्यार्थ्याची महाराष्ट्रात होत आहे.
विशाल कराडच्या निकालानंतर त्याचे आईवडील मात्र भलतेच खूश आहेत. एकीकडे एखादा टक्का कमी पडला तरी मुलांना बोलणारे पालक पाहायला मिळतात. दुसरीकडे सर्व विषयात 35 टक्के पडून आईवडील सेलिब्रेशन करत आहे.
दरम्यान, विशाल कराडवर परिसरातील सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 35 टक्के मिळवल्याने विशालची ठाण्यासोबत राज्यात जोरदार चर्चा आहे.