मुंबई : नुकताच India Skill Report 2022 हा रिपोर्ट जाहीर झाला आहे. यामध्ये येत्या वर्षात रोजगाराच्या संधी कशा असतील? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगारक्षम उमेदवार आहेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसंच देशातील कोणती राज्यं सर्वाधिक रोजगार देतात याबाबतचे माहिती देण्यात आली आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत काही राज्यांचा अव्वल क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांचा रोजगारक्षमतेत पहिल्या दहा राज्यांमध्ये क्रमांक लागतो. जाणून घेऊया यापैकी अव्वल असणारी पाच राज्यं.