शार्क टॅंक इंडिया हा रिऍलिटी शो कोणी बघितला नाही किंवा त्याबद्दल ऐकलं नाही असा शोधूनही सापडणार नाही. ज्यांना नसून इन्व्हेन्शन्समध्ये किंवा नवीन बिझनेसमध्ये आवड आहे अशांसाठी हा शो म्हणजे पर्वणीच. त्यात या शो मधील शार्क्सही त्यांच्या कंपनीचे मालक आहेत. त्यामुळे तेही कोट्याधीश आहेत. पण या शोमध्ये असलेल्या शार्क्सचं शिक्षण नाकी किती झालंय हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया.
अमन गुप्ता BoAt चे सह-संस्थापक आणि CMO अमन गुप्ता, ज्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम येथे शिक्षण घेतले, त्यांनी नंतर सीए करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये शिक्षण घेतले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केले आहे. त्याचे दुसरे MBA केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूएसए मधून आहे. त्यांनी येथे व्यवस्थापन आणि मार्केटिंगमध्ये MBA केले आहे.
विनिता सिंग शुगर कॉस्मेटिक्सच्या (Sugar Cosmetics) संस्थापक आणि सीईओ विनिता सिंग यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
अनुपम मित्तल पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल हे बोस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी देखील घेतली आहे.
नमिता थापर पुण्यात जन्मलेल्या नमिता थापर, एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या (Emcure Pharmaceuticals) कार्यकारी संचालक असून त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील एका शाळेत झाले. नंतर त्यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेतली. त्यानंतर नमिता यांनी MBA केले आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी मिळवली.
पियुष बन्सल लेन्सकार्टचे (LensKart) संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी मॅक्गिल युनिव्हर्सिटी, मॉन्ट्रियल, कॅनडातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याच्याकडे आयआयएम पदव्युत्तर पदवी देखील आहे.