राज्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम अशा (गडचिरोली) आसरल्लीच्या खुर्शिद शेख या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.
2/ 5
आसरल्ली तेलंगणाच्या सीमेवरील अतिदुर्गम गाव असून भाषेची अडचण असताना अशा गावात खुर्शिद शेख यांनी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये शिक्षण विज्ञानाची भाषेची आवड निर्माण केली.
3/ 5
त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे 45 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या 200 वर पोहोचली.
4/ 5
देशभरातल्या 155 शिक्षकामधुन खुर्शिद शेख यांची झाली निवड करण्यात आली आहे.
5/ 5
मुंबई पासून 1 हजार किलोमीटर अंतरावर आसरल्ली हे गाव आहे, तेथे या शिक्षकाने मोठं काम करून दाखवलं आहे.