राज्यात 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून निकालाचा टक्का 3.11 ने घसरला आहे. असे असले तरी 10 वीत 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 वर पोहोचली आहे.
पुण्यातून 5, औरंगाबाद - २२, मुंबई - ६, अमरावती - ७, लातूर - १०८, कोकण - ३ इतक्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहे.
साधारण 45 वर्षांपूर्वी लातूरच्या देशी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शि. वै. खानापुरे यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना एकत्र बोलावून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी एक योजना शिक्षकांसमोर मांडली होती.
यानंतर अन्य शाळांनीही ही कल्पना उचलून धरली. याचा चांगलाच परिणाम दिसून आला आणि लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला व त्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली.
यानंतर पुढील काही वर्षे बोर्डात लातूरचे विद्यार्थी दिसू लागले. शाळांचा हा प्रयोग महाविद्यालयात सुरू झाला.
दरम्यानच्या काळात शाळेत येताना घड्याळ बघायचे मात्र घरी परतताना घड्याळ बघायचे नाही म्हणजे लातूर पॅटर्न, अशी विलासराव देशमुख यांनी केलेली लातूर पॅटर्नची व्याख्या सतत चर्चेत येऊ लागली.