भारत - या यादीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. जगभरात सर्वाधिक महिला पायलट्स भारतात आहेत. भारतात महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 12.4 टक्के आहे.
आयर्लंड - या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथेही महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 9.9 टक्के आहे.
दक्षिण आफ्रिका - या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. तिथेही महिला पायलट्सची संख्या सातत्याने वाढत असून, सध्या हे प्रमाण 9.8 टक्के आहे. तेथील अनेक संघटना एव्हिएशन इंडस्ट्रीत महिलांचं प्रमाण वाढावं, यासाठी प्रयत्नशील आहेत.
ऑस्ट्रेलिया - या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. तिथे महिला पायलट्सचं प्रमाण 7.5 टक्के आहे.
कॅनडा - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 7 टक्के आहे.
जर्मनी - जर्मनी एव्हिएशन सेक्टरसह इतर अनेक सेक्टरमध्ये जेंडर इक्वॅलिटीसाठी प्रयत्न करत आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 6.9 टक्के आहे.
अमेरिका - अमेरिका या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 5.5 टक्के आहे.
युनायटेड किंग्डम - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत युनायटेड किंग्डम आठव्या क्रमांकावर आहे. तिथे महिला पायलट्सचं प्रमाण केवळ 4.7 टक्के आहे.
न्यूझीलंड - सर्वाधिक महिला पायलट्सच्या यादीत न्यूझीलंड नवव्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिथे महिला पायलट्सचं प्रमाण वाढत असून, सध्या ते 4.5 टक्के आहे.
कतार - या यादीत अखेरचा म्हणजेच 10वा क्रमांक कतारचा आहे. त्या ठिकाणी महिला पायलट्सचं प्रमाण 2.4 टक्के आहे.