करिअरमध्ये सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर पुढे जात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे खूप मेहनती असूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नाहीत. एवढंच नाही तर नोकरीची मुलाखत क्रॅक करणं देखील त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमची मुलाखतीत निवड होईल. तसंच मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तुमचा प्रभाव पडेल. चला तर मग जाणून घेऊया.
मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगा हा प्रश्न विचारला जाईल. यावर तुम्हाला प्रभावीपणे उत्तर देणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रश्नाच्या उत्तरावर तुमची निवड होणार की नाही हे अवलंबून असेल. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर प्रभावीपणे द्या. यामध्ये स्वतःबद्दल विचारल्यास तुमच्या Resume ची कॉपी त्यांना सांगू नका. याऐवजी तुमचातील काही टॅलेन्टसबद्दल सांगा. यामुळे तुमचा प्रभाव पडण्यास मदत होईल.
मुलाखत कोणत्याही जॉबबाबत असो यामध्ये तुम्हाला तुमच्या गुणांबद्दल सांगणं महत्त्वाचं आहे. आजकालच्या काळात जॉब मिळवण्यासाठी केवळ शिक्षणच नाहीतर तुमच्यात काही गुण देखील असणं आवश्यक आहे. यालाच स्ट्रेंथ्स म्हणतात. तुमच्यातील स्ट्रेंथ्सबद्दल सांगा हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यामुळे मुलाखत देताना स्वतःच्या गुणांबद्दल आवर्जून सांगा. मात्र गुण सांगताना अतिशयोक्ती होणार नाही ना याची काळजी घ्या. स्वतःबद्दल खरं आणि अचूकच सांगा.
मुलाखत देताना मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या खासगी आयुष्यासोबत काहीही देणं घेणं नाही याची नोंद घ्या. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या बोलण्याचा कंटाळा येईल असं बोलू नका. तुमचं जे काही म्हणणं आहे ते गोष्ट सांगितल्यासारखं न सांगता पॉईंट्समध्ये सांगा. यामुळे तुम्ही किती प्रोडक्टीव्ह आहेत याची कल्पना मुलाखतकाराला येईल.