जगात आणि भारतात स्टार्टअप्स ही संकल्पना आता घर करू लागली आहे. जॉब करण्याऐवजी आता तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळू लागली आहे. त्यात शार्क टॅंकसारख्या शोजमुळे तरुणांमध्ये स्टार्टअप्स सुरु करण्याची इच्छा जागृत होत आहे. भारतही या सर्व गोष्टीत आता मागे नाहीये. ब्रिटेन आणि चीनसारख्या देशांनाही मागे सोडत आता भारतानं स्टार्टअप क्षेत्रात प्रगती केली आहे.